नऊ टप्प्यांत प्रभाग रचनेचे काम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 13, 2025

नऊ टप्प्यांत प्रभाग रचनेचे काम

 नऊ टप्प्यांत प्रभाग रचनेचे काम



महापालिकेच्या वतीने प्रगणक गटाच्या मांडणीचे काम सुरू

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नगरविकास विभागाने ड वर्गीय महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोलापूर महापालिकेच्या वतीने प्रभाग रचनेसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. एकूण नऊ
टप्प्यांमध्ये प्रभाग रचनेचे काम केले जाणार आहे. ११ ते १६ जूनपर्यंत प्रगणक
गटाच्या मांडणीचे काम सुरू केले आहे. तयारी महापालिका निवडणुकीची
राज्यातील २८ महापालिकांच्या  निवडणुका तीन वर्षांपेक्षा अधिक काळांपासून प्रलंबित आहेत.सोलापूर महापालिकेवरही तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट
लागू आहे. न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश मे मध्ये दिले. त्यानंतर निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडे
आठवड्यापूर्वीच प्रभाग रचना निश्चित करण्याविषयी विचारणा केली. मंगळवारी (दि. १०) रात्री नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना चार सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेचे आयुक्त
डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी प्रभाग रचना करण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

चौकट

प्रभाग रचनेचे एकूण पाच टप्प्यात काम
प्रगणक गटाची मांडणी केल्यानंतर प्रभाग रचना तयार करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण पाच टप्पे आहेत.जनगणनेची माहिती १७ ते १८ जून या दोन दिवसांत
तपासली जाणार आहे. स्थळ पाहणी १९ ते २३ जून या कालावधीत केली जाणार आहे. गुगलमॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करण्याचे काम २४ ते २६ जून या कालावधीत केले जाणार आहे. नकाशावर निश्चित केलेल्या प्रभागाची हद्द जागेवर
जाऊन पाहणी २७ ते ३० जून या चार दिवसांत केली जाणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीच्या स्वाक्षऱ्या एक तीन जुलै या कालावधीत केल्या जाणार आहेत.


निवडणूक आयोगाच्या
आदेशानुसार प्रभाग रचनेच्या
कामास आजपासून सुरुवात
केली आहे. निवडणूक आयोगाने
घालून दिलेल्या वेळेत प्रभाग
रचनेची कामे केली जातील. दोन
दिवसांत समितीची स्थापना
केली जाणार आहे.
• डॉ. सचिन ओम्बासे,
आयुक्त, महापालिका.

• प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे ४ ते ८ जुलै या कालावधीत सादर केला जाणार आहे.
• प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, सूचना, हरकती मागवणे १५ ते २१ जुलै
• हरकतीवर व सूचनांवर सुनावणी २२ ते ३१ जुलै
• अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी निवडणूक आयोगास सादर करणे १ ते ७ ऑगस्ट
निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणे २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages