बंद पडलेले शेलगाव-ढोकरी रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ सुरु करा- पालकमंत्री गोरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 13, 2025

बंद पडलेले शेलगाव-ढोकरी रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ सुरु करा- पालकमंत्री गोरे

 बंद पडलेले शेलगाव-ढोकरी रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ सुरु करा- पालकमंत्री गोरे




करमाळा, (कटूसत्य वृत्त):- शेलगाव ते ढोकरी या रस्त्याचे विशेष दुरुस्तीचे गतवर्षी बंद पडलेले काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या अधिक्षक अभियंता यांना दिल्याची माहिती भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शुभम बंडगर यांनी दिली.

मंत्रालयात काल बंडगर यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन शेलगाव ते ढोकरी या 14 कि.मी रस्त्याचे विशेष दुरुस्तीचे काम वर्षाभरापासून बंद असल्याचे निवेदन देत निदर्शनास आणले. 

वांगी परिसरातील रस्ता संघर्ष समितीच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करून हे काम मंजूर करून आणले होते. मे 2024 मध्ये या कामाचा शुभारंभ देखील करण्यात येवून ढोकरी कडून 3 कि.मी.लांबीत तर शेलगाव कडून 1 कि.मी काम ही झाले. मात्र लगेच अचानक हे काम बंद केले गेले. तेव्हापासून अध्याप हे काम बंदच आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडत असून अपघात होत आहेत अशी माहीती शुभम यांनी मंत्री महोदय यांना दिली. 
 
 यावर त्या क्षणी मंत्री यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे सोलापूरचे अधिक्षक अभियंता यांना तात्काळ हे रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.  

 याच बरोबर वांगी-३ येथील बाह्यवळण रस्त्यातील ७०० मीटर अपूर्ण रस्त्याच्या कामालाही निधी देण्याची मागणीही बंडगर यांनी केली. 

 शुभम बंडगर यांच्या या प्रयत्नातून तात्काळ ही कामे सुरू होतील अशी अपेक्षा आता लोकांना लागून राहिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages