जिल्ह्यातील टँकरची संख्या घटली सध्या ६ गावात ८ टँकरद्वारे पाणी पुरवठा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 13, 2025

जिल्ह्यातील टँकरची संख्या घटली सध्या ६ गावात ८ टँकरद्वारे पाणी पुरवठा

 जिल्ह्यातील टँकरची संख्या घटली सध्या ६ गावात ८ टँकरद्वारे पाणी पुरवठा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक गावात टंचाई सदृश्य
परिस्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावात १३० ते १४० टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील अनेक तालुक्यात समाधानकारक पाऊस पडलेला आहे. त्यामुळे अनेक गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने टँकरची संख्या घटली. सध्या जिल्ह्यातील ६ गावात ८ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी, कणबस,इंगळगी, बंकलगी तर अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे, उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी
यांचा गावात सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. येत्या काही दिवसात त्या गावातील पाणी पुरवठा योजना पुर्ण क्षमतेने सुरु झाल्यास सुरु असलेले टँकरही बंद करण्यात येतील, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages