जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम ठरला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 14, 2025

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम ठरला

 जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम ठरला



सोलापूर(कटुसत्य वृत्त):- सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिकेवर ६ मे २०२५ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार कार्यकाळ संपुष्टात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका चार महिन्याच्या विहित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील ३२ जिल्हा परिषदा, ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका, सदस्य संख्या व प्रभाग रचना करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना

देण्यात आल्या आहेत.


१४ जुलै रोजी जिल्हाधिकारी प्रारूप प्रभाग रचनेसाठीची अधिसूचना प्रसिध्द करणार आहेत. त्यावर हरकती तक्रार करण्यासाठी २१ जुलै ही अंतिम तारीख राहणार आहे. २८ जुलैपर्यंत प्राप्त झालेल्या हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्त यांना प्रस्ताव जिल्हाधिकारी सादर करणार आहेत. ११ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालावर विभागीय आयुक्त अंतिम निर्णय घेणार आहेत. १८ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग व किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत.


चौकट 

६८ जि.प. गट आणि १३६ पं.स.गणांची रचना

सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील २८ लाख ४ हजार ६२ एवढी लोकसंख्या गृहित धरण्यात आली. त्यापैकी ४ लाख २६ हजार २२५ अनुसूचित जाती तर ४८ हजार ६१५ इतके अनुसुचित जमातीची लोकसंख्या गृहित धरुन जिल्हा परिषदेचे ६८ तर पंचायत समितीच्या १३६ सदस्यांसाठी अनुक्रमे गट आणि गणांची रचना करण्यात येणार आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages