दूषित पाणी शोधण्यासाठी आता इंडोस्कोपी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 14, 2025

दूषित पाणी शोधण्यासाठी आता इंडोस्कोपी

 दूषित पाणी शोधण्यासाठी आता इंडोस्कोपी



सोलापूर(कटुसत्य वृत्त):- दूषित पाणीपुरवठा शोधण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून इंडोस्कोपीचा वापर केला जाणार आहे. हे काम तीन मक्तेदारांना देण्यात आले आहे. यासाठी तीन यंत्र खरेदी करण्यात आली आहेत. चार दिवसात यंत्र दाखल होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त

डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.


शहरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे ज्या भागात दुषित पाणीपुरवठा होतो, त्या भागात महापालिकेचा आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि ड्रेनेज विभाग सतर्क होऊन काम करत आहे. शहरात अनेक भागात दूषित पाणीपुरवठा झाला. त्यामुळे महापालिकेने शहरातील पाईपलाईन आणि ड्रेनेजलाईन तपासणीसाठी रोबोटचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता. झोन आठमधील कुचननगरमधील चौकामध्ये मुंबईवरून आलेल्या रोबोटच्या माध्यमातून पाईपलाईनच्या तपासणीचे प्रात्यक्षिक घेतले. प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यात आली होती. मात्र, रोबोटच्या माध्यमातून तपासणी करताना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे रोवट प्रक्रिया रद्द करत आता इंडोस्कोपीचा वापर करून दूषित पाणीपुरवठा शोध घेतला जाणार आहे.


या कामाचा मक्ता तीन मक्तेदारांना दिला आहे. वर्कऑर्डरही देण्यात आली आहे. चार दिवसांत ही यंत्र दाखल होणार आहेत. त्यानंतर दूषित असो अथवा ड्रेनेज लाईन गळती असो याचा घेण्यास मदत होईल. काही दिवसात याचे घेतले जाईल. महापालिकेच्या वतीने सद्या आठवड्यातून एक वेळ पाणी पुरवठा केला समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण होऊनही पाणी कमी करण्यात महापालिकेला अद्यापही यश

यातच आता इंडोस्कोपीचा नवीन प्रयोग असल्याने नागरिकांना जेमतेम शुद्ध पाणी अपेक्षा आहे.


पाणी शोध प्रात्यक्षिक जात आहे. पुरवठ्याचे दिवस आलेले नाही. केला  जात पुरवठा होईल, ही


चौकट 

उद्यान विभागाकडून फेर तपासणी

रस्ते दुभाजकामधील वृक्षाचे ऑडिट करण्यासाठी आलेल्या टीमने मातीचे नमुने घेऊन पाहणी केली आहे. पाहणीचा अहवाल आठवड्यात येणार आहे. तरीही महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने पुन्हा तपासणी केली जाणार आहे. झाडे जिवंत आहेत का? किती उंचीची झाडे लावण्यात आली होती. याची तपासणी केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.


चौकट 

आरोप-प्रत्यारोप थांबणार

दूषित पाणी पुरवठ्यामुळे बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमधील दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला होता. त्यांचा तपासणी अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच आहे. या मुलींच्या कुटुंबियांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भेट घेऊन सांत्वन केले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला होता. त्यात त्यांनी या प्रकरणाचे खापर महापालिकेवर फोडले होते. त्या दोघींना दूषित पाण्यामुळेच जीव गमवावा लागल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र आता या नव्या प्रयोगामुळे भविष्यात होणारे आरोप-प्रत्यारोप थांबण्याची शक्यता आहे.


चौकट 

७० फूट रोडवर रात्रीची गस्त

७० फूट रोड पुन्हा अतिक्रमणच्या विळख्यात सापडला आहे. अतिक्रमण पथक गेल्यानंतर विक्रेते पुन्हा रस्त्यांवर येत असल्याने दिवसाबरोबर रात्रीही या भागात अतिक्रमण पथकांची गस्त ठेवली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यांवर भाजी विक्रेत्यांना बसता येणार नाही. चिप्पा मार्केटमध्ये बसून व्यापार करवा अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी पुन्हा दिला आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages