शहरातील बेकायदा इमारतीवर लवकरच हातोडा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 14, 2025

शहरातील बेकायदा इमारतीवर लवकरच हातोडा

 शहरातील बेकायदा इमारतीवर लवकरच हातोडा

सोलापूर (कटुसत्य वृत्त):- शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा इमारती आहेत. या इमारतीमध्ये फ्रंट मार्जिन, ओपन स्पेस, साईट मार्जिन नसल्यामुळे आगीसारख्या दुर्घटना घडल्यास मदत कार्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे बेकायदा इमारती पाडण्याशिवाय पर्याय नाही. महापालिका प्रशासनाकडून आठवड्यात या इमारतींना अंतिम नोटीसा देत स्वतःहून पाडा अन्यथा महापालिकेकडून या इमारती पाडल्या जातील, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.


शहरातील बेकायदा ९६ बांधकामा बरोबर आयुक्तांनी केलेल्या तपासणीत पुन्हा नव्याने ४६ बेकायदा इमारती आढळून आल्या आहेत. या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली आहे. नागरिक राहण्यात आले आहेत. काहींनी रिवाईज केले आहे. तर इमारतीमध्ये पार्किंग व्यवस्था नाही. काहींनी काम बंद केले आहे. पार्किंग, फ्रंट मार्जिन, एफएसआय सर्व तपासण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात अनियमता आहे. त्यांना कायदेशिर संधी देण्यात आल्या आहेत. मात्र या इमारती नियमित करता येत नाही, कोणत्या नियमाखाली अधिकृत करता येत नाहीत, चार मजल्याची परवानगी घेऊन सात आठ मजले बांधण्यात आले आहेत. या इमारती पडाण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे या इमारतीना आठवड्यात अंतिम नोटीस दिल्या जाणार आहेत.


चौकट 

बेकायदा खरेदी-विक्रीला चाफ

शहरातील अनाधिकृत ९६ इमारती प्रकरणाची प्रसिध्दीकरण झालेनंतर देखील खरेदी विक्री झाल्याचे निदर्शनास येत आहे. नियम ४४ नुसार सदर मिळकतदारांकडे ओसी (वापर परवाना) आवश्यक आहे. परंतु, अॅग्रीमेंट फॉर सेल करताना बांधकाम परवाना असलेशिवाय खरेदी विक्री आणि नोंदणी करू नये असे पत्र मुद्राक विभागाला दिले आहे. त्यामुळे आता बेकायदा इमारतीतील खरेदी विक्रीला चाफ बसणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages