मोहोळसाठी नवे बसस्थानक आणि डेपो मंजूर करावा : बारसकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 14, 2025

मोहोळसाठी नवे बसस्थानक आणि डेपो मंजूर करावा : बारसकर

 मोहोळसाठी नवे बसस्थानक आणि डेपो मंजूर करावा : बारसकर



मोहोळ(कटुसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोहोळ शहरात तालुक्यासाठी बीओटी तत्त्वावर चांगल्या पध्दतीने एस.टी. स्टैंड करावे आणि मोहोळ शहरामध्ये नवीन एस.टी. बस डेपो मंजूर करुन मिळावा, अशी मागणी शिवसेना ओ.बी.सी. राज्य प्रमुख रमेश बारसकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली.


राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नियोजित सोलापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या क्रांती भवन, शिवसेना कार्यालय येथे भेट दिली. यावेळी मोहोळ येथून पंढरपूर मार्गे सांगोला, कोल्हापूर, रत्नागिरी, लांजा, गोवा, इचलकरंजी, इस्लामपूर, सातारा, आटपाडी, विटा व टेंभुर्णी मार्गे पुणे, मुंबई, अहिल्यानगर, शिर्डी, धुळे, नाशिक, कुर्डुवाडी अशा शेकडो गाड्यांची आवक जावक होत आहे. मोहोळ तालुका हा सोलापूर जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने तेथे बस स्टँडची व्यवस्था म्हणावी अशी अद्यापपर्यंत झालेली नाही. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यात एस.टी. बस डेपो आहे. किंबहुना पश्चिम महाराष्ट्रामध्ये ५७ तालुक्यामध्ये जवळ-जवळ सर्वच तालुक्यामध्ये एस.टी. बस डेपो आहे. परंतु मोहोळ तालुक्यामध्ये एस.टी. बस डेपो अद्यापपर्यंत नाही. मोहोळ तालुका हा १०४ गावांचा तालुका आहे. त्यामुळे मोहोळ शहरामध्ये एस.टी. बस डेपो होणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी परिवहन मंत्री सरनाईक यांच्याकडे केली.


यावेळी जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, अतुल क्षीरसागर, मंगेश पांढरे, गणेश गावडे, सागर अष्टुळ, अजय कुर्डे, श्रीकांत गाढवे, आबा कांबळे, सुरज जम्मा, गोडसे, शिंदे, सौरभ बारसकर, जितेंद्र आष्टुळ, विजय लवटे, सुलतान पटेल, उमेश गोटे, राजू गुंड, शिवाजी पासले, प्रकाश सोनवणे, सोमनाथ माळी, सोमनाथ भालेराव, प्रशांत बारसकर, ऋषिकेश शिंदे, आर्यन बारसकर, आकाश सिताप, विशाल कांबळे, सुरज जाधव, विशाल पवार, रामा माळी, रामा भालेराव, चेतन सादिगले आदी उपस्थित होते.


चौकट 

पेनूर येथेही स्वागत

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पेनूर येथेही उत्स्फूर्त असे जंगी स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी त्यांचा सत्कार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांची महाआरती यावेळी ना. सरनाईक यांच्या हस्ते पार पडली. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये युवा सरपंच सुजित आवारे यांनी त्यांचे स्वागत केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages