मंत्री भरत गोगावले यांच्या प्रतिमेस मारले जोडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 17, 2025

मंत्री भरत गोगावले यांच्या प्रतिमेस मारले जोडे

 मंत्री भरत गोगावले यांच्या प्रतिमेस मारले जोडे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे न यांच्या विरोधात एकनाथ शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी त वादग्रस्त विधान करून शिवसेना फुटीला रश्मी ठाकरेच कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर जिल्हा शिवसेना आणि महिला आघाडीच्यावतीने सोमवारी, सात रस्ता येथे तीव्र धरणे आंदोलन केले. यावेळी गोगावले यांच्या प्रतिमेस जोडोमार आंदोलन करून महिला आघाडीच्यावतीने गोगावले यांना बांगड्यांचा अहेर भेट देण्यात आला.


यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी रश्मी वहिनींबद्दल बोलाल तर याद राखा जीभ हासडून हातात देऊ असा इशारा दिला. तर जिल्हाप्रमुख संतोष नपाटील म्हणाले, भरत गोगावले इन यांनी पुन्हा एकदा असे विधान केले तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. पदाच्या लालसेपोटी त्यांनी हे बेताल वक्तव्य केले आहे. सत्तेसाठी शिवसेना पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांनी गोगावले यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगली पाहिजे.


पदाच्या लालसेपोटी बेताल वक्तव्य करणाऱ्या गोगावले यांचा धिक्कार असो आदी आशयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख रविकांत कांबळे, खंडू सलगरकर, शिवा माळी, इलियास शेख, सत्तार शेख, कबीर शेख, संतोष घोडके, लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला चिवडशेट्टी, शहर संघटिका प्रीती नायर, जोहरा रंगरेज, मीनल दास, उपशहर संघटक मीनाक्षी गवळी, रमा सरवदे, मीना सुरवसे, अनिता राठोड आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages