Hot Posts

6/recent/ticker-posts

फ्लॅट देण्याच्या बहाण्याने एक कोटी तीन लाखांची फसवणूक

 फ्लॅट देण्याच्या बहाण्याने एक कोटी तीन लाखांची फसवणूक

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मजरेवाडी येथील इम्पिरिअर टॉवरमधील तीन फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एक कोटी तीन लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत अनस बशीर शेख (वय 28, रा. रेल्वे लाईन, सोलापूर) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

अब्दुलरशीद अब्दुलगणी बाडीवाले (रा. सम्राट नगर, मजरेवाडी, सोलापूर) व आसिफ इक्बाल नजीर सय्यद (रा. लुडस् अपार्टमेंट, मोदी, सोलापूर) यांनी फिर्यादी अनस शेख यांच्याशी संपर्क साधला. मजरेवाडी येथील सर्व्हे क्र. 54/62 मधील इम्पेरिअर टॉवर येथे तीन फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले. फ्लॅट नं. 501, 502 आणि 301 अनस शेख यांना देण्याचे ठरले. त्यासाठी अनस यांच्याकडून 2022 ते 2025 दरम्यान 92 लाख सहा हजार रुपये घेतले.

पैसे घेऊनही त्यांनी खरेदीखत करून दिले नाही. त्यानंतर बांधकामासाठी पैसे कमी पडत आहेत म्हणून पुन्हा 11 लाख 70 हजार रुपये घेतले. दरम्यान, पैसे देऊनही आरोपी फ्लॅट देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे अनस शेख यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अब्दुलरशीद अब्दुलगणी बाडीवाले व आसिफ इक्बाल नजीर सय्यद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Reactions

Post a Comment

0 Comments