हराळवाडीत पहिलीच्या विद्यार्थ्याचे बैलगाडी आणि फोर व्हीलर वाहनातून प्रवेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 17, 2025

हराळवाडीत पहिलीच्या विद्यार्थ्याचे बैलगाडी आणि फोर व्हीलर वाहनातून प्रवेश

 हराळवाडीत पहिलीच्या विद्यार्थ्याचे बैलगाडी आणि फोर व्हीलर वाहनातून प्रवेश



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हराळवाडी येथे पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून आणि आधुनिकतेची कास धरत चार चाकी वाहनातून करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हराळवाडी येथे शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव आनंदाने व उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांची सुंदर सजवलेली बैलगाडीतून व फोरव्हिलर मधून मिरवणूक काढण्यात आली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडून आलेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक टोप्या व मुखवटे घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.औक्षण करून त्यांचे पाऊलांचे ठसे घेण्यात आले व त्याची एक प्रत पालकांना देण्यात आली.

याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, मोफत लेखनसाहित्य,बुट व साॅक्स तसेच ओळखपत्र वाटप करण्यात आले.या प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ गावडे, ग्रामपंचायत उपसरपंच लिंगराज व्हनमाने, सामाजिक कार्यकर्ते.पै.माऊली हेगडे ,प्रधान धोडमिसे, हैबत शेळके,व माता पालक मायाबाई माडकर, सावित्रीबाई माडकर, सोनाली चवरे, कविता माने उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक कविता फुटाणे व शिक्षक सचिन शिंदे, शंकर पाटील, संतोष माळगोंडे, सचिन निरगिरे, संजय ननवरे, पद्मसिंह वरडे, यांनी परिश्रम घेतले.तर मोहोळ तालुक्यातील शिक्षण विस्तारधिकारी अतुलकुमार माने यांनी हराळवाडीतील जि.प.प्रा.शाळेला भेट दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages