बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचा लुक बदलला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 4, 2025

बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचा लुक बदलला

 बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचा लुक बदलला



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री सिध्देश्वर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती
पदाची सुत्र हाती घेतल्यानंतर दिलीप माने यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाची चोरी रोखण्यासाठी
व्यापारी कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवली. प्रवाशी रिक्षांना देखील दुपारी १२ पर्यंत आवारात
येण्यास प्रतिबंध केला. आता कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत ड्रेसकोड व ओळख पत्र बंधनकारक केल्याने मार्केट कमेटीच्या कामकाजाबरोबर कर्मचाऱ्यांचा जणू लूक बदलल्याचे दिसून येते.शेतीमालाची चोरी रोखण्यासाठी व्यापारी, कर्मचारी व संबधीत ठिकाणंचे सुरक्षा रक्षाकावर जबाबदारी सोपवली.
बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ववत सुरु करण्यात आले. मुख्य कार्यालयातील सुमारे ८५ कर्मचारी सकाळी ५ वाजता मार्केट कमेटीमध्ये येवून नियंत्रण करीत आहेत.शेतीमालामुळे प्रमुख रस्त्यावर अडथळा होवू नये याची दक्षता,वजनमापे, लिलाव बोली,मालाची बिले आदी बाबीकडे लक्ष दिले जात आहे.कामकाज व नियोजनातील बदलानंतर आता कर्मचाऱ्यांना गणवेश व ओळखपत्र कामाचे वेळेत वापरणे बंधनकारक केले आहे. शेतकऱ्यांना देखील कर्मचाऱ्यांना ओळखता व अडचणी सांगता येणार आहे. याची अमंलबजावणी देखील आजपासून करण्यात आली. शेतकरी व बाजार समितीमध्ये येणाऱ्यांसाठी स्वच्छ पाण्याची सोय करण्यासाठी पाणी टाकीचे काम, नळ कनेक्शन जोडणी करुन आर.ओ. सुरू करण्याचे आदेश सभापती दिलीप माने यांनी प्रशासनास दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages