सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक जाहीर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. १४ जून ही वर्गणी भरण्याची अंतिम तारीख राहणार असून १६ जून रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येणार आहे. या यादीवर १६ ते १७ जून असे दोन दिवस हरकती वा सूचना दाखल करण्याची तारीख आहे. १८ ते १९ जून यादरम्यान नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती. २० जून रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी व उमेदवारांची यादी प्रसिध्द. २४ जून रोजी दुपारी ४.३० वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येईल. २५ जून रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे. ३० जून रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान आणि त्यानंतर मतमोजणी असा या निवडणुकीचा कार्यक्रम राहणार आहे.
0 Comments