शहरातील नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेवर निषेध मोर्चा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 4, 2025

शहरातील नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेवर निषेध मोर्चा

 शहरातील नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेवर निषेध मोर्चा



सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-गत अनेक दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.प्रभाग क्रमांक १ मधील विविध नागरी समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीन सोमवारी महापालिकेवर निषेध मोर्चा काढण्यात आला. प्रभाग क्र. १ मधील प्रभाकर वस्ती, सम्राट चौक, मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, हनुमान नगर,चमडा कारखाना, पोफल वस्ती,मंठाळकर वस्ती आदी परिसरात विविध नागरी समस्या आहेत.
 या परिसरात पिण्याचे पाणी, सार्वजनिक शौचालय, ड्रेनेज लाईन,रस्त्याचे समस्या आहे. खासगी झोपडपट्टीमध्ये रमाई आवास योजना लागू करण्यात यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात ओपन जीम करावी. येथे माता रमाई व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारण्यात यावा आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. चार हुतात्मा पुतळा चौक येथून महापालिकेवर हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला. याप्रसंगी संतोष पवार, सुजित अवघडे, शोभा सोनवणे, प्रमोद भोसले, दत्तात्रय बनसोडे, बसवराज कोळी, इरफान शेख, अल्मेहराज आबादीराजे,प्रज्ञासागर गायकवाड, वैभव गंगणे,सोमनाथ शिंदे, श्रीकांत वाघमारे,प्रदीप भालशंकर यांच्यासह प्रभाग क्रमांक १ मधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages