लोकशाही दिनात झेडपीच्याच तक्रारी..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 4, 2025

लोकशाही दिनात झेडपीच्याच तक्रारी..!

 लोकशाही दिनात झेडपीच्याच तक्रारी..!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  नागरिकांच्या तक्रार निवारणसाठी सुरु करण्यात आलेल्या लोकशाही दिनात जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या. एकूण ३३ तक्रारीपैकी ६ तक्रारी या जिल्हा परिषद संबंधितच आहेत. त्याचे त्वरित निपटारा करण्याचे निर्देश महसूल अधिकाऱ्यांनी दिले आहेत.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सोमवारी दि. २ जनू रोजीच्या लोकशाही दिनात जिल्ह्यातील १६ शासकीय कार्यालयात ३३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत असून त्या कार्यालयांनी तत्काळ या तक्रारींचा निपटारा करावा. तसेच तक्रार करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांशी सर्व संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी चांगली वर्तणूक ठेवावी, असे निर्देश महसूल उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिले.


यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सहायक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे, जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र संगीता खंदारे, पोलिस विभाग, आरोग्य विभाग, तहसीलदार, जिल्हा परिषद यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.


लोकशाही दिनात जिल्हा परिषद सोलापूर ६, यू एल सी कार्यालय १, पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण ५, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय २, तहसीलदार उत्तर सोलापूर कार्यालय १, सार्वजनिक बांधकाम कार्यालय सोलापूर २, तहसीलदार महसूल कार्यालय २, उपजिल्हाधिकारी भूसंपादन १, तहसीलदार माढा १, पोलीस आयुक्त सोलापूर शहर कार्यालय १, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय ३, तहसीलदार मोहोळ कार्यालय ३, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन कार्यालय १ अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर १, प्रबंधक जिल्हा अग्रणी बँक सोलापूर २, तहसीलदार दक्षिण सोलापूर

कार्यालय १ अशा एकूण ३३ तक्रारी अर्ज प्राप्त झालेल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages