जिल्हा प्रशासनाची वर्षभरात १५५ कोटींची उद्दिष्टपूर्ती वसुली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 4, 2025

जिल्हा प्रशासनाची वर्षभरात १५५ कोटींची उद्दिष्टपूर्ती वसुली

 जिल्हा प्रशासनाची वर्षभरात १५५ कोटींची उद्दिष्टपूर्ती वसुली


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य शासनाने जिल्हा महसूल खात्यास २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण १५३ कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट जमीन महसूल व गौण खनिजच्या माध्यमातून दिले होते. जिल्हा प्रशासनाने वर्षभरात १५५ कोटी २४ लाख रुपयांची वसुली करून शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.


महसूलमंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल खात्याचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासनाने दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केल्याने अभिनंदन केले. शासनाने जिल्हा प्रशासनास जमीन महसुलीच्या माध्यमातून २३ कोटी ९६ लाख रुपयांच्या वसुलीची उद्दिष्ट दिले होते. वर्षभरात प्रशासनाने या विभागात तब्बल ५७ कोटी ७५ लाख रुपयांची वसुली करून २४१ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. शासनाने गौण खनिजच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनास १३० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. मात्र वाळू लिलाव वेळेत न झाल्याने, ठेका कमी असल्याने यंदा ९७ कोटी रुपयांची वसुली गौण खनिजच्या माध्यमातून झाली होती. ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ती करण्यात प्रशासनाला यश आले.


२०२५-२६ या चालू वर्षात दगडखाणी परवान्यातून ३० कोटी रुपयांची वसुली अपेक्षित धरली आहे. वाळू लिलावाच्या माध्यमातून ३० कोटींची तर राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे महामार्ग आर्दीच्या माध्यमातून ३० कोटी रुपयांची वसुली प्रशासनाला अपेक्षित आहे. खडी क्रशर धारकाकडून होणारी वसुली २० कोटी रुपयांची व इतर प्रशासकीय यंत्रणाकडून होणारी वसुली २० कोटी रुपयांची अपेक्षित आहे. अनधिकृत गौण खनिज वाहतूक इतर गौण खनिज वाहतूक दंडाच्या माध्यमातून दहा कोटी रुपयांची वसुली अपेक्षित करण्यात आली आहे.


चौकट 

चालू वर्षात १६० कोटी रुपयांचे उद्दिष्ट

शासनाने जिल्हा प्रशासनास सन २०२५- २६ या वर्षासाठी १६० कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ती करण्यास सांगितले आहे. जिल्हा प्रशासनाने ही उद्दिष्टपूर्ती वेळेत करण्याचे नियोजन केले आहे. वर्षभरात ८८४ प्रकरणांत १६० कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages