१६ जूनपासून सुरू होणार शाळा! पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार एक गणवेश, बूट, सॉक्स - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 4, 2025

१६ जूनपासून सुरू होणार शाळा! पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार एक गणवेश, बूट, सॉक्स

 १६ जूनपासून सुरू होणार शाळा! पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार एक गणवेश, बूट, सॉक्स




पहिलीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकासाठी पहावी लागणार ३० जूनपर्यंत वाट

           सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७७ शाळा असून त्याअंतर्गत दोन लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १६ जून रोजी एक गणवेश, बुटाचा एक जोड व सॉक्सच्या दोन जोडी मिळणार आहेत.   त्यासाठीचा निधी शासनाकडून वितरित झाला आहे.

शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सध्या पहिल्या गणवेशाची शिलाई युद्धपातळीवर सुरू आहे. २० दिवसांपूर्वी शासनाकडून आलेला गणवेश, सॉक्स, बुटासाठीचा निधी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. आता गणवेशाची शिलाई पूर्ण झाल्यानंतर व सॉक्स, बूट खरेदी केल्यानंतर त्याची पावती जोडून गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे द्यायची आहे. त्यानंतर त्यांच्याकडून संबंधितांना तो निधी वितरित होईल. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश मिळायलाच हवा, असे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी व सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत.

पहिला गणवेश शाळेच्या पहिल्या दिवशी तर दुसरा गणवेश दिवाळीपूर्वी मिळणार आहे. त्यामुळे पहिला गणवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना आठवडाभर तोच गणवेश घालून शाळेत यावे लागणार आहे. वास्तविक पाहता दोन्ही गणवेशात किमान एक महिन्याचा फरक असणे आवश्यक आहे, पण निधीअभावी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशासाठी काही महिन्यांची वाट पहावी लागणार आहे.

पहिल्याच दिवशी मिळेल एक गणवेश जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी (१६ जून) एक गणवेश, दोन सॉक्स जोडी आणि बूट मिळेल. त्यादृष्टीने नियोजन केले असून गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना तसे निर्देश दिले आहेत.

दुसरा गणवेश दिवाळीपूर्वी विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून दोन गणवेश दिले जातात. त्यासाठी शासनाकडून प्रत्येकी ६०० रुपयांचा निधी दिला जातो. एक गणवेश शाळेचा तर दुसरा गणवेश स्काऊट गाइडच्या धर्तीवर मिळणार आहे. तो गणवेश दिवाळीपूर्वी मिळेल, असे नियोजन आहे. सध्या पहिल्या गणवेशाचा निधी शासनाकडून वितरित झाला आहे. हा गणवेश देखील यंदा शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातूनच दिला जाणार आहे. गतवर्षी कापड कटिंग करून तो बचत गटांच्या माध्यमातून शिलाई करून देण्यात आला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages