Hot Posts

6/recent/ticker-posts

रेल्वे राज्यमंत्र्यांकडून स्थानकांची पाहणी

 रेल्वे राज्यमंत्र्यांकडून स्थानकांची पाहणी


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्रीय रेल्वे व जलशक्ती मंत्री व्ही. सोमण्णा यांनी एक जून रोजी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील ताज सुल्तानपूर, कलबुर्गी आणि सोलापूर या तीन प्रमुख स्थानकांची पाहणी केली.


पाहणी दौऱ्याची सुरुवात ताज सुलतानपूर स्थानकापासून झाली, तेथे त्यांनी मालवाहतुकीच्या ठिकाणांची पाहणी करत माहिती घेतली व काही सूचनाही केल्या. सुविधा आणि ऑपरेशनल प्लॅनचा आढावाही घेतला. मालवाहतुकीच्या धोरणात्मक भूमिकेबद्दल व प्रादेशिक व्यापारावर त्याचा होणारा परिणाम याबद्दल प्रशासनाने त्यांना माहिती दिली.


कलबुर्गी स्थानकावर, त्यांचे प्रशासनासह प्रवासी संघटनांनी स्वागत केले. त्यांनी अमृत स्टेशन - मास्टर प्लॅनची सविस्तर पाहणी केली. प्रवाशांसाठीच्या सोयीसुविधा वाढवण्यासाठी आधुनिक व शाश्वत पायाभूत सुविधांचे महत्त्व अधोरेखित केले. उपस्थित प्रतिनिधींसोबत तक्रार निवारण बैठकही घेतली, जी सार्वजनिक सहभाग आणि पारदर्शक प्रशासनासाठी त्याची वचनबद्धता यात दर्शवली.


त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विविध चालू व भविष्यातील रेल्वेचा विकास प्रकल्पांबद्दल माहिती दिली. शिवाय, त्यांनी कर्नाटकसाठी राखून ठेवलेल्या महत्त्वपूर्ण अर्थसंकल्पीय तरतुदींवर प्रकाश टाकला, सर्वसमावेशक वाढ व कनेक्टिव्हिटीवर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले.


सोलापूर येथे पाहणी करताना त्यांनी अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत स्टेशनवरील पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या प्रकल्पांबद्दल व्यापक माहिती घेतली. या प्रकल्पाचे उद्दिष्ट येथील स्थानकाचे आधुनिकीकरणासह प्रवाशांसाठी अनुकूल स्थानकात रूपांतरित केला जात आहे. का याचीही पाहणी त्यांनी केली. या दौऱ्यात सोलापूरचे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजीत मिश्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी होते.

Reactions

Post a Comment

0 Comments