युवकांनी पर्यावरणपूरक वस्तूंचा अधिकाधिक वापर करणेबाबत समाजामध्ये जनजागृती करावी- आयुक्त डॉ ओम्बासे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 4, 2025

युवकांनी पर्यावरणपूरक वस्तूंचा अधिकाधिक वापर करणेबाबत समाजामध्ये जनजागृती करावी- आयुक्त डॉ ओम्बासे

 युवकांनी पर्यावरणपूरक वस्तूंचा अधिकाधिक वापर करणेबाबत समाजामध्ये जनजागृती करावी- आयुक्त डॉ ओम्बासे


 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- युवकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा अधिकाधिक वापर करणेबाबत समाजामध्ये जनजागृती करावी, असे आवाहन सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी आज येथे केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो आणि सोलापूर महानगरपालिका यांच्यावतीने महापालिकेच्या आवारात ठेवण्यात आलेल्या सेल्फी विथ पर्यावरण फोटो बुथच्या उद्घाटनप्रसंगी डॉ ओम्बासे बोलत होते.  
             सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांचे हस्ते आज सेल्फी फोटो बुथचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उपायुक्त किरणकुमार मोरे, सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव, जनसंपर्क व कामगार अधिकारी अनिकेत वाघमारे, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, केंद्रीय संचार ब्यूरोचे निवृत्त अधिकारी सतीश घोडके, पर्यावरण विभागाचे व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर, राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशनचे व्यवस्थापक समीर मुलाणी आणि कार्यालय सहायक जे एम हन्नुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
              सदर सेल्फी फोटो बुथ आजपासून ५ जून जागतिक पर्यावरण दिनापर्यंत लोकांसाठी सेल्फी काढण्यासाठी उपलब्ध असणार आहे. युवा वर्गामध्ये पर्यावरण सुरक्षा आणि संवर्धनबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
      कार्यक्रमाला मनपा पर्यावरण विभाग, राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन अधिकारी, कर्मचारी आणि बचत गटाच्या महिला उपस्थित होते.
 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages