मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणेंनी..
फॉर्च्युनर गाडीवर लिहिलेल्या मजकुरामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्यात गाजलेल्या 'हगवणे प्रकरणा'नंतर फॉर्च्युनर या गाडीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलल्याचं पाहायला मिळतंय. अशातच करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल खूपसे यांनी आपल्या फॉर्च्युनर गाडीवर लिहिलेल्या मजकुरामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
फॉर्च्युनर ही महागडी आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी गाडी सध्या काहीशा वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मिळालेल्या फॉर्च्युनरवर आरोप-प्रत्यारोप झाले. त्यातच हगवणे कुटुंबीयांच्या गाडीच्या प्रकरणाने साऱ्यांचे लक्ष वेधले. त्यामुळे फॉर्च्युनर गाडी पाहिली की लोक वेगवेगळे अर्थ काढू लागलेत.
माझी फॉर्च्यूनर त्यातली नाही
सर्व बडे पुढारी आणि राजकीय मंडळींकडे दिसणारे फॉर्च्यूनर हागवणे यांच्या प्रकरणानंतर फारच चर्चेत आली. यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना दिलेल्या फॉर्च्यूनरवर ही बरीच उलट सुलट चर्चा व आरोप झाले. पण सध्या यामुळेच करमाळयात फॉर्च्युनर गाडीची सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे. ती गाडीवर लिहिलेल्या मजकुरामुळे. आजकाल हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनरमधून उतरला की संशय येतोय म्हणून करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल खूपसे यांनी मात्र आपल्या फॉर्च्यूनर गाडीवर वेगळाच मजकूर लिहिला आणि त्याची चर्चा सुरू झाली आहे.
'तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर,माझा रुबाबच वेगळा,हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा. अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलय, पण हगवणे मुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू धुतलंय, असा त्यांनी गाडीवर लिहिलेला हा मजकूर सध्या सोलापूर जिल्ह्यात चर्चेत आहे.
फॉर्च्यूनर नाही दिली तर मी हेक्टर पेटवून देईन
वैष्णवी हगवणे प्रकरणात, अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, फॉर्च्यूनर देण्याअगोदर मी एमजी हेक्टर ही गाडी बुक केली होती. त्यांनी वादावादी केली. मला फॉर्च्यूनर नाही दिली, तर मी यांची हेक्टर पेटवून देईन, असे सांगण्यात आले गाडी दिली नाही तर लग्न मोडेन, अशी धमकी दिली होती. चांदीच्या ताटाची, सोन्याची मागणी केली होती.
0 Comments