शिवरायांच्या अवमानाने शिवप्रेमींमध्ये संताप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 5, 2025

शिवरायांच्या अवमानाने शिवप्रेमींमध्ये संताप

 शिवरायांच्या अवमानाने शिवप्रेमींमध्ये संताप

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  रेल्वे विभागाच्या आयआरसीटीसी विभागाच्या वतीने भारत गौरव यात्रा टुरिस्ट ट्रेन यात्रा सुरु केली जाणार आहे. या उपक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज सर्किट नाव देण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. अनेक शिवप्रेमींनी सर्किट शब्दाला आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. या नाराजीची दखल जिल्हा प्रशासनाने घेत उपक्रमांच्या नावामध्ये बदल करत सर्किट शब्दाचा उल्लेख काढून टाकला.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारसाला मानवंदना देण्यासाठी प्रमुख किल्ल्यांप्रमाणेच त्या भोवतीच्या धार्मिक स्थळांचा अविस्मरणीय प्रवास घडवून आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहा जूनच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने पहिली रेल्वे नऊ जूनला मुंबई सीएसटी स्थानकावरुन सुटणार आहे. या उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे अवाहन केले होते. काही सामाजिक संघटना, राजकीय संघटनांनी जिल्हा प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारल्याने प्रशासनाने यामध्ये झालेली चूक मान्य करत चुकीची दुरुस्ती केली. आक्षेप घेतलेला शब्द वगळला. आता छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणास्थळ मोहीम असे नाव दिल्याने शिवप्रेमींची नाराजी दूर झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages