शिवरायांच्या मंदिरास निधी कमी पडणार नाही- आ.विजयकुमार देशमुख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 17, 2025

शिवरायांच्या मंदिरास निधी कमी पडणार नाही- आ.विजयकुमार देशमुख

 शिवरायांच्या मंदिरास निधी कमी पडणार नाही- आ.विजयकुमार देशमुख



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री अंबिका माता मंदिर, तोडकरी वस्ती, बाळे येथे बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे भूमिपूजन शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

या छत्रपती शिवरायांच्या मंदिरास निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही आमदार विजयकुमार देशमुख व शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिली.

निधी अभावी बाळे येथील छत्रपती शिवरायांच्या मंदिराचे काम रखडले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे पक्षाचे अध्यक्ष अमोल शिंदे यांनी व शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी या मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या मंदिरातून छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर होईल.

सर्व समाजासाठी हे मंदिर प्रेरणादायी ठरेल व हे भवन सर्वांसाठी खुले असले पाहिजे असा मानस अमोल शिंदे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी राजन जाधव, विनोद भोसले, राजू आलूरे, विनय ढेपे, आबा सावंत, आनंद भवर, सुनील भोसले यांच्यासह बाळे परिसरातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages