प्रभाग क्र. 21 मध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 17, 2025

प्रभाग क्र. 21 मध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

 प्रभाग क्र. 21 मध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 26 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 21 मध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप काल रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्यवरांच्या उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल व शालेय साहित्य वाटप ताज सोशल ग्रुप आणि नगरसेवक तौफिक शेख यांच्या प्रयत्नाने करण्यात आले.
यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते साहित्य चे वाटप करण्यात आले, दरम्यान या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ता उमेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संतोष पवार, शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दयमा शेटजी, महाराष्ट्र उपाध्यक्ष किसन जाधव, अदनान शेख, रिजवान मुल्ला, एजाज शेख सर, महाराष्ट्राचे सचिव इरफान एमडी शेख, राष्ट्रवादी महिला आघाडीचे शहराध्यक्ष जोगधनकर मॅडम, माजी नगरसेविका वाहेदा आप्पा शेख तसलीम इरफान शेख व दक्षिणचे पाटील ताई यांची उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजसेवक आसिफ राजे शेख, इरफान शेख ,जावेद सय्यद, उर्फ वास्तव, तौसीफ सगरी, जुबेर इनामदार,जावेद JD , साजिद शेख, असलम शेख, मोहसीन शेख ,सईद इनामदार उर्फ टिंकू, अखिल नाईकवाडी, नबीलाल नदाफ, ताज पेंटर, शाहिद फुफा, आरिफ लालूकोट, गौस तांबोळी, यासीन हुंडेकरी, इसाक शेख, मुसा भाई शेख, मोहम्मद शेख चाचा, दाऊद शेख, सईद शेख, मुज्जू कलवल, गणी भाई शेख, जावेद कल्याणी, वशिम वस्ताद, पठाण चाचा, कलवल चाचा, यांनी परिश्रम घेतले, या कार्यक्रमाला नई जिंदगी येथील सिद्धेश्वर नगर तसेच इतर नगरातील सर्व जमातीचे  अध्यक्ष व पदाधिकारी तसेच ताज सोशल ग्रुपचे कार्यकर्ते शुभचिंतक व महिला भगिनी तसेच, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages