घंटागाडी कर्मचाऱ्यांचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 5, 2025

घंटागाडी कर्मचाऱ्यांचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

 घंटागाडी कर्मचाऱ्यांचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  महापालिका घंटागाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे वेतन न देता तसेच सहायक आयुक्तांनी निर्देश देऊनही कार्यवाही केली जात नसल्याने झोन क्रमांक ५ मधील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी जुळे सोलापुरातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत जोरदार घोषणा दिल्या.


काही महिन्यापूर्वी किमान वेतन लागू करावे व इतर मागण्यांसाठी सोलापुरातील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. यामुळे सोलापूर शहरात कचऱ्याचे ढीग साचले होते. यावर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी मध्यस्थी करत नियमाप्रमाणे वेतन द्यावे, असे ठेकेदारांना सांगितले होते. पण दोन महिने उलटूनही अद्याप घंटागाडी कर्मचाऱ्यांना महिना भरल्यानंतर पूर्ण पगार न मिळाल्याने बुधवारी जुळे सोलापूर येथील पाण्याच्या टाकीवर घंटागाडी कर्मचाऱ्यांनी चढून शोले स्टाईल आंदोलन केले. यावेळी किमान वेतन नियमानुसार वेतन मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. यावेळी विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी या घंटागाडी कर्मचाऱ्यांना टाकीवरून खाली येण्यास सांगितले व त्यांची समजूत काढली. यावेळी नवनाथ पवार (वय ३६, रा. मंद्रुप) या कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यास तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा घंटागाडी कर्मचाऱ्यांनी दिला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages