जि.प. प्राथमिक शाळा बिजवडी येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 17, 2025

जि.प. प्राथमिक शाळा बिजवडी येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात

 जि.प. प्राथमिक शाळा बिजवडी येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात



अकलूज (कटूसत्य वृत्त):- प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाला शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. अशाच प्रकारचा विद्यार्थी प्रवेशोत्सव आज दिनांक १६जून २०२५ रोजी आमच्या जि.प.प्राथमिक शाळा,रावबहाद्दूर गट शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

आज शाळा रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी व फुग्यांनी आकर्षक सजवली गेली होती. सर्व शिक्षक व मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज होते. कार गाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. नवीन विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या नवागतांचे पहिले पाऊल म्हणून पावलांचे ठसे घेण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.  शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. आशाताई भजनावळे व उपाध्यक्षा सौ. दिपाली लोखंडे आणि पालक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके तसेच गणवेश वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांना बूट व सॉक्स चे वाटप देखील करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत राऊत यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी शाळेच्या यशस्वी परंपरेचा व आगामी वर्षाच्या योजनांचा आढावा दिला.
विद्यार्थी प्रवेशोत्सव हा फक्त स्वागताचा कार्यक्रम नसून तो विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा, शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टी देणारा एक प्रेरणादायी क्षण असतो. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आत्मीयता व आपुलकी निर्माण होते. असे मत शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत राऊत यांनी मांडले.
  सर्व विद्यार्थी व पालक यांना गोड खाऊ म्हणून जिलेबी वाटप करण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आशा भजनावळे, दिपाली लोखंडे, रोहिणी बंडलकर, सुवर्णा कांबळे, पूजा बोडरे, रतन बंडलकर, शहनाज नदाफ, पूजा ढोबळे, राधा भजनावळे, अश्विनी गरुड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक अजमीर फकीर यांनी केले.मुख्याध्यापक श्रीकांत राऊत यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages