Hot Posts

6/recent/ticker-posts

बाजार समितीत शेतकऱ्यांना सुविधा द्याव्या

 बाजार समितीत शेतकऱ्यांना सुविधा द्याव्या



मंद्रूप(काटूसत्य वृत्त):- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा शेतकरी बांधवांना सोबत घेऊन बाजार समितीसमोर मोठे आंदोलन छेडू, असा इशारा श्री बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांनी दिला आहे.


सोलापूर कृषी उत्पन्न बाजार रसमिती ही राज्यातील तिसऱ्या न क्रमांकाची मोठी बाजार समितीं म्हणून ओळखली जाते. या बाजार समितीची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींपेक्षा जास्त आहे. इतकी मोठी बाजार समिती असताना ज त्या मानाने शेतकऱ्यांसाठी मात्र, कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध त नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यांचा कृषी माल चोरीस जातो, यासह अनेक समस्या व त्रास शेतकरी. बांधवांना सहन करावा लागत आहे.


यावेळी हत्तुरे म्हणाले, बाजार समितीमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते, दरवर्षी बाजार समिती कोट्यवधी रुपये कमावते, ज्यांच्या जीवावर हे उत्पन्न मिळते त्या अन्नदात्या शेतकरी बांधवांना कोणत्याच सुविधा बाजार समितीत मिळत नाहीत.


बाजार समितीत कृषी माल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना मुक्काम करण्यासाठी शेतकरी भवन नसल्यामुळे ते बाजार समितीच्या आवारात थंडीत, पावसात भिजत पोत्यावरच झोपतात. कृषी माल साठवून ठेवण्यासाठी शीतगृह अद्ययावत केले जात नाही. शेतकरी बांधवांना, दर्जेदार जेवण मिळत नाही. पिण्यास स्वच्छ पाणी व आंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही. शौचालयाची चांगली सुविधा उपलब्ध नाही. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना भौतिक सुविधा मिळत नाहीत. बाजार समितीत प्रचंड अस्वच्छता आहे. बाजार समितीत अतिक्रमण झाल्याने कृषिमाल आणताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. काही शेतकऱ्यांना वेळेवर कृषिमाल विक्रीचे पैसे दिले जात नाहीत. यासह अनेक प्रश्न शेतकरी बांधवांचे आजही तसेच आहेत. बाजार समितीवर प्रस्थापित नेतेच निवडून जातात. ते शेतकरी प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे वर्षानुवर्षे हे प्रश्न सुटताना दिसत नाहीत. आठ दिवसांत शेतकरी बांधवांचे प्रश्न मार्गी न लावल्यास सोलापूर बाजार समिती समोर शेतकरी बांधवांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छोड़, असा इशारा त्यांनी शेवटी बोलताना दिला.


Reactions

Post a Comment

0 Comments