प्रमाणित बियाणे वितरणा करीता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 27, 2025

प्रमाणित बियाणे वितरणा करीता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

 प्रमाणित बियाणे वितरणा करीता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया या नवीन अभियानाला मंजुरी दिली आहे. यात समूह आधारित कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सदर अभियानांतर्गत सोयाबीन, करडई, सुर्यफुल या पिकांसाठी सोलापूर जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. सदर कार्यक्रमांतर्गत खरीप हंगामा मध्ये सोयाबिन व सुर्यफुल पिकाचे प्रमाणित बियाणे तसेच रब्बी हंगामा करीता करडई पिकाचे प्रमाणित बियाणे 100 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये 0.20 हेक्टर ते जास्तीत जास्त 1 हेक्टर मर्यादेत बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या करीता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबीच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
तरी जिल्ह्यातील सर्वसाधारण, अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती प्रवर्गातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, वरील घटकाचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक लाभार्थींनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in farmer login या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages