लोककल्याणकारी कार्यामुळे अन्नछत्र मंडळाचे नाव जगभरात : आ. दानवे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 27, 2025

लोककल्याणकारी कार्यामुळे अन्नछत्र मंडळाचे नाव जगभरात : आ. दानवे

 लोककल्याणकारी कार्यामुळे अन्नछत्र मंडळाचे नाव जगभरात : आ. दानवे


अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली न्यासाकडून सुरु असलेल्या धार्मिक कार्याबरोबरच लोककल्याणकारी कार्यामुळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे नाव संपूर्ण राज्यासह देश विदेशात पोहोचले असल्याचे मनोगत भोकरदन (जि. जालना) चे आमदार संतोष दानवे यांनी व्यक्त केले.


श्री क्षेत्र नागेश्वर संस्थान, पळसखेडा मुर्तड (ता.भोकरदन) येथे श्री शनेश्वर जन्मोत्सवानिमित्त ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली झोळ (करमाळा) यांच्या व ह.भ.प. गुरुवर्य संदीपान महाराज शिंदे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमाचे उद्घाटन जन्मेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी आ. दानवे हे बोलत होते.


याप्रसंगी शिवकृष्ण योगी श्री गंजीधर बाबा, सिंदखेडराजा येथील राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजेजाधव, ह.भ.प. प्रकाश महाराज गंजाळ, ह.भ.प. दिनकर महाराज थुट्टे, ह.भ.प. अभिमन्यू महाराज बाजड यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


दरम्यान, जन्मेजयराजे भोसले यांचा सत्कार आ. संतोष दानवे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच आमदार दानवे यांच्यासह विविध मान्यवरांचा सत्कार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी श्री क्षेत्र अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, मधुकर दानवे, बाबा संगीत महाराज शिंदे, रोहन शिर्के, रोहित खोबरे, अश्पाक काझी, प्रशांत शिंदे, स्वामिनाथ गुरव, स्वामिनाथ बाबर, रमेश हळसंगी, संतोष माने आदिजन उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages