नागेश करजगी ऑर्किड स्कुलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 16, 2025

नागेश करजगी ऑर्किड स्कुलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

 नागेश करजगी ऑर्किड स्कुलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील सीबीएसई अभ्यासक्रम शैक्षणिक क्षेत्रात 'सोलापूर पॅटर्न ' चे नाव असलेले व गुणवंताची खाण असलेल्या सोनाशंकर ज्ञान विकास ट्रस्ट च्या नागेश करजगी ऑर्किड स्कुलच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत असे यश संपादन केले.यानिमित्ताने यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गुणगौरव सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले होते.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांना कष्टाने शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या पालकांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार दादा करजगी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संस्थेच्या सचिवा वर्षाताई विभुते,स्कुलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी,प्राचार्या रुपाली हजारे,शाळेच्या मार्गदर्शिका मीना पारखे, ज्यू.कॉलेजच्या प्राचार्या स्मिता कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास शाळेतील सर्व गुणवंत विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.   शाळेच्या वतीने  विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य पालकत्व निभावून आपल्या मुलांना योग्य शिक्षण दिले,त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी प्रोत्साहित केले म्हणून, या यशस्वी विद्यार्थ्यांच्या समवेत त्यांच्या पालकांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला.या उपक्रमाचे पालकवर्गातून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले.यंदाच्या परीक्षेत शाळेतील ईश्वरी तावरे, त्रिशा भंडारी, वैष्णवी होलेपाटील, नील श्रीराम, माहीर पटेल, वरद मालानी, संकीत मखाना,सिद्धी साठे ,सुशील शिवशरण, काव्या कोठारी, रेवती भोजने, साहिल शेख, ईश्वरी वांगी, सृष्टी ढोकरे, आयुष बिराजदार, श्रीजीत कलानी,कार्तिकी गायकवाड,प्रथमेश जाधव, चैतन्या भंडारी या विद्यार्थ्यांनी ९०% च्यावर गुण घेऊन शाळेची गुणवत्ता व नावलौकिक वाढवीला.
यासर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्राचार्या रुपाली हजारे यांनी अभिनंदन केले व त्यांना भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील नववी व दहावीचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages