आठवड्यातून दोनदाच सोलापूर ते गोवा विमानसेवा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 1, 2025

आठवड्यातून दोनदाच सोलापूर ते गोवा विमानसेवा

 आठवड्यातून दोनदाच सोलापूर ते गोवा विमानसेवा



 तिकिटे १६ मेपासून विक्रीसाठी उपलब्ध

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर ते गोवादरम्यान २६ मेपासून फ्लाय ९१ या कंपनीच्यावतीने विमानसेवा सुरू केली जाणार आहे. कंपनीने तसा ई-मेला आम्हाला पाठविला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

या विमानसेवेची तिकिटे साधारणतः दहा दिवस अगोदर म्हणजे १६ मेपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. सोमवार आणि शुक्रवार अशी आठवड्यात दोनदा सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर विमानसेवा असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

गोवा येथून सकाळी ७.२० वाजता विमान सोलापूरकडे निघणार आहे. सोलापुरातून सकाळी ८.५० वाजता हेच विमान परत गोव्याकडे जाणार असल्याची वेळ नियोजित केली आहे. सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर विमान प्रवासासाठी किती रुपयांचे तिकीट असणार आहे? याची माहिती मात्र विमान कंपनीने अद्याप दिलेली नाही. लवकरच ही माहिती देखील प्रसिद्ध केली जाणार आहे. २६ मेपासून होटगीरोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. होटगीरोड विमानतळावर विमानसेवेच्या दिवशी पोलिस मनुष्यबळ देण्याचाही निर्णय झालेला आहे.

सोलापूर-पुणे-मुंबई या हवाई मार्गावर विमानसेवा देण्यासाठी स्टार एअर कंपनीला निविदा मिळाली आहे. सोलापुरातील होटगीरोड विमानतळावर टू-सी या वर्गवारीतील विमान उतरू शकतात. स्टार कंपनीकडे मात्र असलेली सर्व विमाने ही थ्री-सी या वर्गवारीतील आहेत. त्यामुळे निविदा मिळूनही स्टार एअरकडून विमानसेवा सुरू झालेली नाही. होटगीरोड विमानतळावर उतरू शकतील, अशी विमाने जर स्टार एअरने सोलापूरच्या विमानसेवेतून माघार घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

या सूचनेनंतर स्टार एअर सोलापूरच्या विमानसेवेतून माघार घेण्याची शक्यता आहे. माघार घेतल्याचे पत्र अद्याप प्रशासनाला मिळालेले नाही. स्टार एअरने माघार घेतल्यास सोलापूर ते मुंबई या विमानसेवेसाठी फ्लाय ९१ कंपनीला नियुक्त केले जाऊ शकते. या कंपनीकडे तशी विमाने आहेत, डीजीसीएकडून विमानसेवेचा परवानाही फ्लाय ९१ कंपनीला मिळालेला आहे. जून अखेरपर्यंत सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होईल, असा अंदाज जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages