बार्शी तालुक्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेतून ७ कोटी ४० लाख अनुदान
बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी तालुक्यातील ३४ जलसाठ्यातील ३४ लाख १६ हजार घनमीटर काढलेल्या गाळाचे २ हजार ७०१ गाळ वाहून नेणाऱ्या शेतकऱ्यांना ७ कोटी ४० लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून, ग्रामपंचायतीमार्फत या अनुदानाचे वाटप होणार आहे.
आमदार दिलीप सोपल यांनी या अनुदानाची माहिती दिली. आमदार सोपल म्हणाले, की धरण, जलसाठ्यामधून गाळ काढण्यात आलेल्या व पूर्ण झालेल्या कामांकरिता जलयुक्त शिवार अभियान २.० योजनेच्या लेखाशिर्षातून तलावातील काढलेल्या गाळाचे अशासकीय संस्थांचे व शेतकऱ्यांचे अनुदानाचे देयक अदा करण्यासाठी नुकतेच आदेश देण्यात आलेले आहेत.
बार्शी तालुक्यामधील ल. पा. तलाव कळंबवाडी (भाग-२), ल. पा. तलाव वैराग (भाग-२), मध्यम प्रकल्प हिंगणी (पा.) (भाग- २) (ब),मध्यम प्रकल्प हिंगणी (पा.) (भाग- ४), ल.पा. तलाव तावडी (भाग-२),ल. पा. तलाव ममदापूर (भाग-२),ल. पा. तलाव पाथरी,ल. पा. तलाव पाथरी (भाग-२),ल. पा. तलाव पाथरी (भाग-३),ल.पा. तलाव, बाभूळगाव , ल . पा. तलाव बाभूळगाव (भाग-२), ल.पा. तलाव बाभूळगाव (भाग-३),ल. पा. तलाव पाथरी (भाग-४),ल. पा. तलाव शेळगाव (आर) (भाग-३) ,मध्यम प्रकल्प हिंगणी (पा.) (भाग-७), ल. पा. तावडी,ल. पा. तावडी (भाग-३),ल. पा. झाडी बोरगाव ,ल. पा. तलाव झाडी बोरगाव (भाग-२),ल.पा. तलाव कोरेगाव,ल. पा. तलाव काटेगाव (भाग-२),ल.पा. तलाव वैराग,ल. पा. तलाव गोरमाळे (भाग-२ ) , मध्यम प्रकल्प हिंगणी (पा.) (भाग- ३),मध्यम प्रकल्प हिंगणी (पा.) (भाग- २) (अ),मध्यम प्रकल्प हिंगणी (पा.), (भाग-५), मध्यम प्रकल्प हिंगणी (पा.) (भाग-६), ल. पा. तलाव कोरेगाव (भाग-२),ल.पा. तलाव शेळगाव आर,ल. पा. तलाव शेळगाव (आर) (भाग-२),
मध्यम प्रकल्प पिंपळगाव ढाळे (भाग-२), मध्यम प्रकल्प पिंपळगाव ढाळे (भाग-३), मध्यम प्रकल्प पिंपळगाव ढाळे (भाग-४),ल.पा. तलाव ममदापूर या
तलावाच्या जलसाठ्यामधून काढलेल्या गाळामधून शेतक-यांनी सदरचा गाळ
वाहून नेऊन त्यांचे शेतात पसरला आहे, लवकरच पात्र शेतकरी आणि संस्थांच्या बँक खात्यामध्ये आरटीजीएसद्वारे रक्कम वितरित करण्यात येणार आहे, असेही आमदार सोपल यांनी सांगितले.
0 Comments