शिंदे चौकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 18, 2026

शिंदे चौकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

 शिंदे चौकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- शिंदे चौक येथील हुतात्मा तरुण मंडळ व शिवराज प्रतिष्ठान यांच्या वतीने यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सालाबादप्रमाणे यंदाही चौकात भव्य आणि आकर्षक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. परिसर भगव्या पताकांनी, रोषणाईने आणि आकर्षक सजावटीने सजविण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या वेळी मंडळाचे आधारस्तंभ राम  जाधव, उत्सवाध्यक्ष ओंकार धावणे, राहुल दहिहंडे, संदीप आबा जाधव, गणेश अकलूजकर, ललित धावणे, विजय गुंड, इकबाल मोगल, सूरज जाधव, रोहन दळवी, सुधीर शितोळे, सुधीर निकम, कृष्णा धावणे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यंदाच्या जयंतीनिमित्त मंडळाच्या वतीने विशेष ऐतिहासिक देखावा सादर करण्यात आला. या देखाव्यात महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला आणि शिवजयंती उत्सवाची परंपरा सुरू केली, या ऐतिहासिक घटनेचे जिवंत चित्रण करण्यात आले. देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. इतिहासातील या महत्त्वपूर्ण घटनेची माहिती तरुण पिढीपर्यंत पोहोचावी हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान शिवगर्जना, देशभक्तीपर गीतांमुळे वातावरण शिवमय झाले होते. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.

एकूणच हुतात्मा तरुण मंडळ व शिवराज प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने साजरी करण्यात आलेली शिवजयंती उत्सवमूर्ती स्थापना आणि ऐतिहासिक देखावा यामुळे शिंदे चौक परिसरात भक्ती, अभिमान आणि इतिहासाची जाणीव यांचे अनोखे वातावरण निर्माण झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages