लक्ष्मी-आनंद विद्यामंदिरमध्ये शिवचरित्रातून शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 20, 2026

लक्ष्मी-आनंद विद्यामंदिरमध्ये शिवचरित्रातून शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

लक्ष्मी-आनंद विद्यामंदिरमध्ये शिवचरित्रातून शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- श्री माऊली शिक्षण संस्थेमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात सनराईज प्री-प्राइमरी सेक्शनमधील चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी चिमुकल्यांनी आपली मनोगतेही सादर केली.
लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित गीतगायन, पोवाडा, भाषण, शिवगर्जना अशा विविध कलाप्रकारांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून शिवव्याख्याते प्रा. ओम इंगळे सर यांचे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व्याख्यान संपन्न झाले. “शिवाजी महाराजांच्या विचारांप्रमाणे आचरण करण्याची गरज विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
हा शिवजन्मोत्सव सोहळा संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे व सचिव सुरजा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य विकास करळे, पीआरओ सागर खुळे, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages