Hot Posts

6/recent/ticker-posts

सानिया महमद अली शेख यांना शिक्षणासाठी सर्वोपत्तरी मदत करणार- फारूक मटके

 सानिया महमद अली शेख यांना शिक्षणासाठी 

सर्वोपत्तरी मदत करणार- फारूक मटके

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर येथील बापूजी नगर येथील रहिवासी असलेले कुल्फी विकणारे महमद शेख यांची मुलगी सानिया वालचंद कॉलेजमधून इयत्ता बारावी मध्ये 92.67% टक्के घेऊन प्रथम क्रमांक मिळवले म्हणून फारूक मटके सर मित्रपरिवार तर्फे त्यांना हार, कपडे व  रोख रक्कम रु. 13000/- (तेरा हजार रुपये) देऊन  सत्कार करण्यात आला. सानिया यांच्या पुढील शिक्षणासाठी  सर्वोपतरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. सदर प्रसंगी सानिया चे आई वडील, व परिवारतील सर्व सदस्य व शरीफ भागनगरी, शफी चितापुरे, इस्माईल जमादार, दाऊद इरकल,  सलीम पीरजादे,  अतहर परवेझ दफेदार , अबुबकर नललामंदु,  एजाज शेख, रिझवान शेख, महमदअली तारकश आदी मान्यवर उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments