अन्नप्पा सत्तूबर यांची शिवसेना
जिल्हाप्रमुख या पदासाठी कार्यकर्त्यांमधून मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते, उपजिल्हाप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकनिष्ठ मानले जाणारे अन्नप्पा सत्तूबर यांचं नाव जिल्हाप्रमुख पदासाठी आघाडीवर आहे.शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख नागेश्वर उर्फ अन्नप्पा सत्तूबर यांची राज्याच्या नेत्यांकडे जिल्हा प्रमुख या पदासाठी मागणी कार्यकर्त्यांमधून करण्यात आले आहे.अन्नप्पा सत्तूबर हे शिवसेना शिंदे गट यांच्याबरोबर सुरुवातीच्या काळापासून आहेत. धनगर समाजाचे नेते असून त्यांना मागील काळात अनेक पदापासून हुलकावणी मिळाली होती.वरिष्ठ पातळीवरून त्यांचे प्रयत्न चालू आहेत. जिल्हाप्रमुख पदासाठी चढाओढ असली तरी वरिष्ठांनी त्यांना जिल्हाप्रमुख करण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजते.
एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडे सोलापुरात धनगर समाजातील एकही बडा नेता दिसून येत नाही. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात धनगर समाजाची असलेली मोठी संख्या पाहता आणि आगामी महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तूबर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला पद मिळावे अशी अनेकांचे अपेक्षा आहे.
0 Comments