अजितदादांनी केला वाल्मिक कराडच्या पॅटर्न बंद
बीड (कटूसत्य वृत्त):-मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यानंतर बीड जिल्ह्यात झालेल्या राजकीय घडमोडीने वातावरण ढवळून निघाले आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप मुंडे यांचा विश्वासू सहकारी वाल्मीक कराड याचा देशमुख खून प्रकरणातील हात या सगळ्याचा परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर झाला. आता मात्र अजित पवार यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारत डीपीसीमधील वाल्मीक कराड पॅटर्न उधळून लावला आहे. 91 कोटीची निधीत वाढ करत त्यांनी बीडकरांना विकास कामांचा विश्वास दिला आहे. वाढती गुन्हेगारी, राजकीय हस्तक्षेप, दरोडे, खून आणि ढासळत असलेली कायदा व सुव्यवस्था यामुळे बीड जिल्ह्याची राज्यभरात बदनामी झाली. अशा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वतःकडे घेतले. एक आव्हान म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. दोन बैठका घेत त्यांनी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा, विकास कामे, त्यासाठीचा निधी, रखडलेले प्रकल्प याची माहिती घेतली आणि आता जिल्हानियोजन समितीचा निधी 91 कोटींनी वाढवून दिला. एकूण 575 कोटींचे नियोजन डीपीसीत करण्यात आले आहे. येत्या सोमवारी (ता. 9) रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे गेल्याचा थेट फायदा बीडला होताना दिसतो आहे. जिल्हा विकास आराखड्यासाठीचा निधी वाढवण्यात आला असून यात 91 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 575 कोटी रुपयांच्या विकास निधीचे नियोजन होणार आहे. जिल्ह्याचा मागच्या वर्षीचा विकास आराखडा 484 कोटी रुपयांचा होता. यंदा त्यात 91 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्येमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा समोर आला. तसेच जिल्ह्यातील वाळू माफियागीरी, राख माफियागीरी, प्रशासनातील अधिकाऱ्यांची ठराविक नेत्यांसोबतच्या मिलीभगतमुळे विकासाचा वाढलेला अनुशेष या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेतले. त्यानंतर सर्वप्रथम त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत वाढ केली. तत्पुर्वी पोलिस अधीक्षकांचीही बदली झाली. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली झाली. अशा पद्धतीने जिल्ह्यात साफसफाई करत अजित पवार यांनी बीडचा कारभार आपल्या पद्धतीने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बीडवर लागलेला बदनामीचा डाग पुसून या जिल्ह्याला विकासाच्या ट्रॅकवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विकास कामात गैरप्रकार, हलगर्जीपण अजिबात खपवून घेतला नाही, असे अजित पवार वारंवार बैठकांमधून सांगतात.
सोमवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुन्हा याचा अनुभव आणि अजित पवारांच्या कामाचा धडका बीडकरांना दिसणार आहे. बीडच्या पाणी प्रश्नावरही या बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. महिनाभर बीडकरांना पाणी न मिळाल्याने संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी शहरात निदर्शने करत अजित पवार यांच्या प्रतिमेला अंघोळ घातली होती.
0 Comments