तपासणीत उद्योजकांचे पितळ उघडे महापालिकेकडून कामांची पोलखोल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 23, 2025

तपासणीत उद्योजकांचे पितळ उघडे महापालिकेकडून कामांची पोलखोल

 तपासणीत उद्योजकांचे पितळ उघडे महापालिकेकडून कामांची पोलखोल



सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- रोड अक्कलकोट एमआयडीसीमध्ये अनेक उद्योजकांनी केलेल्या बांधकामाची पाहणी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली. पहिल्या दिवसाच्या तपासणीमध्येच अनेक उद्योजकांचे पितळ उघडे पडले. अनेक कारखान्यात कुठे साईट मार्जिन नाही, कुठे फ्रंट मार्जिन नाही  तर काही कारखान्यात अग्निशामक विरोधक यंत्रणा नसल्याच्या बाबी समोर आल्या. काही कारखान्यातील पाण्याच्या बोर बंद अवस्थेत तर काही कारखान्यांमधील अग्निशमन यंत्रणा कालबाह्य असल्याचे वास्तव या तपासणीत पुढे आले.सेंट्रल टेक्स्टाईलमध्ये झालेल्या अग्नितांडवानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीने गुरुवारी नऊ पथकांतून एमआयडीसीतील बांधकामाची तपासणी केली. यामध्ये अनेक कारखान्यामध्ये नागरिकांचे वास्तव्य काही कारखाने बंद अवस्थेत तर काही कारखान्यामध्ये स्वतः मालक तर काही कारखान्यामध्ये कामगारांना देखिल राहण्यास जागा दिल्याचे वास्तव पुढे आले.तर काही कारखानदारांनी अग्रिशमन दलाची गाडी अपत्कालीन परिस्थितीत आत
जाईल अशी अशी जागा सोडली नाही, असे अनेक पथकांच्या निदर्शनास आले.टाऊन प्लॅनिंगचा इंजिनिअर, कर संकलन निरीक्षक आणि अग्निशमन दलाचा जवान असे पथक आहे. पहिल्यादिवशी प्रत्येक पथकाने २० ते २५ मिळकतीची तपासणी केली. टाऊन प्लॅनिंगचा इंजिनिअरने इमारतीचे बांधकाम नियमाप्रमाणे केले आहे का? नियमानुसार फ्रंट साईट मॉर्जीन सोडली आहे का? ओपन जागा कालबाह्य सिलिंडर एका कारखान्यामध्ये तपासणी करत असताना फायर ब्रिगेडच्या जवानाने केलेल्या तपासणीत फायर यंत्रणा नसल्याचे निदर्शनास आले. पाण्याची बोर बंद अवस्थेत होती. आगीपासून संरक्षण मिळण्यासाठी भिंतीवर लटकवलेले अग्निशामक यंत्र दिसून आले; मात्र अग्निशामक सिलिंडर कालबाह्य झाली होती. दोन वर्षापासून अग्निशामक सिलिंडर रिफिलिंग केले नसल्याचे आढळून आले.शिल्लक आहे का? पाण्याचा मुबलक साठा आहे का? यांची, तर कर संकलन निरीक्षकांनी मिळकत कोणाच्या नावावर आहे? आपत्कालीन मार्ग आहे का? या गोष्टींचे ऑडिट करण्यात आले. पहिल्या
दिवशीच्या तपासणीत अनेक उद्योग फेल ठरले असल्याचे तपासणी पथकांच्या निदर्शनास आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages