विमानसेवा, रेल्वे, पाणी प्रश्नांसंबंधी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ओढले ताशेरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 23, 2025

विमानसेवा, रेल्वे, पाणी प्रश्नांसंबंधी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ओढले ताशेरे

 विमानसेवा, रेल्वे, पाणी प्रश्नांसंबंधी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ओढले ताशेरे


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात विमानतळ आहे पण विमानसेवा नाही. रेल्वेचे जाळे आहे पण निर्धारित वेळेपेक्षा रेल्वे चार-पाच तासाने उशिरा धावतात. म्हणायला स्मार्ट सिटी परंतु पाणीपुरवठ्याबाबत ढिसाळ नियोजन आहे. सोलापुरातून अनेक नेते होऊन गेले. मात्र, सोलापूरचा विकास आहे त्याठिकाणीच आहे, असे ताशेरे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ओढले. शिवसेना 'उबाठा'चे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे सोलापूर संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, आ. प्रवीण स्वामी, उपनेत्या अस्मिता गायकवाड, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे,जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी, गणेश वानकर, ,संभाजी शिंदे, राज्य विस्तारक सिध्दाराम शीलवंत यांच्यासह रविकांत कांबळे, खंडू सलगरकर, बालाजी चौगुले, संतोष घोडके, शिवा माळी, प्रिया बसवंती, मीनल दास, शशिकला चिवडशेट्टी, रवी घंटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.ना. अंबादास दानवे पुढे म्हणाले, शिवसेना पक्ष हा जनतेचे आणि शेतकऱ्यांची कामे करणारा पक्ष आहे. सोलापूरचा महत्वाकांक्षी असलेला पाणी प्रश्नाबाबत प्रत्येक वर्गातून आंदोलन करा. या संपर्क कार्यालयातून रंजल्या-गांजल्यांचे प्रश्न सोडवा. जनता नेहमी आपल्या पाठीशी उभे राहील. जिल्हाप्रमुख संतोष पाटील याप्रसंगी बोलताना म्हणाले, या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना व प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages