.तर हगवणेच्या वकिलाची सनद रद्द झाली पाहिजे, अंजली दमानियांचा संताप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 29, 2025

.तर हगवणेच्या वकिलाची सनद रद्द झाली पाहिजे, अंजली दमानियांचा संताप

 .तर हगवणेच्या वकिलाची सनद रद्द झाली पाहिजे, 

अंजली दमानियांचा संताप


 पुणे  (कटूसत्य वृत्त):-दोन कोटी रुपयांच्या हुंडय़ासाठी मानसिक आणि शारिरीक छळ केल्यामुळे वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. हुंडाबळीच्या या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले असताना हगवणे कुटुंबाच्या बाजूने उभे राहणारे वकील विपुल दुशिंग यांनी न्यायालयात धक्कादायक दावे केले.

दुशिंग यांनी वैष्णवीची बदनामी सुरु केल्याने त्यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली. आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही उडी घेत अॅड. विपुल दुशिंग यांच्यावर तीव्र शब्दांमध्ये हल्ला चढवला आहे.

हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांनी काल कोर्टात जे मांडले ते ऐकून खूप राग आला आहे. विपुल दुशिंग घरगुती हिंसाचाराचे समर्थन करतात का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.

प्लास्टिकच्या छडीने मारहाण केली, तर प्लास्टिकची छडी हत्यार आहे का? असे ते कोर्टात म्हणाले. वैष्णवीची बदनामी त्यांनी करायला सुरुवात केली. नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणे हा छळ आहे का? असे ते कोर्टात बोलले. असे विचारणाऱ्या या विद्वान वकिलांना घरगुती हिंसाचाराचे नियम माहीत आहेत का? असा सवालही दमानिया यांनी केला.

कायद्याच्या कलम 3 मध्ये घरगुती हिंसाचाराची व्याख्या व्यापक पद्धतीने केली आहे. ज्यामध्ये हे समाविष्ट आहे, शारीरिक, मानसिक, शाब्दिक, भावनिक, लैंगिक आणि आर्थिक अत्याचार – हुंड्यासाठी छळ, – पीडितेला किंवा तिच्याशी संबंधित इतर कोणत्याही व्यक्तीला अत्याचार करण्याची धमकी देण्याचे कृत्य. घरगुती हिंसाचाराचे समर्थन जर हे वकील विपुल दुशिंग करत असतील तर अशा वकिलाची सनद रद्द झाली पाहिजे. पुणे बार असोसिएशनला हात जोडून विनंती की या माणसाची सनद रद्द झाली पाहिजे, अशी मागणीही दमानिया यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages