देशभक्तीचा अभिमान, ऑपरेशन सिंदूरच्या प्रेरणेतून केली थारची सजावट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 16, 2025

देशभक्तीचा अभिमान, ऑपरेशन सिंदूरच्या प्रेरणेतून केली थारची सजावट

 देशभक्तीचा अभिमान, ऑपरेशन सिंदूरच्या प्रेरणेतून केली थारची सजावट



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या सोलापूर शहरात एक खास थार कार चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी स्वतःची थार कार ‘ऑपरेशन सिंदूर’ या सैनिकी मोहिमेच्या धर्तीवर खास सजवली आहे. अमोल शिंदे यांनी सांगितले की, कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमीका सिंह यांच्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेने त्यांना भारावून टाकले. देशासाठी योगदान देणाऱ्या या महिला सैनिकांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी ही थार कार अशा प्रकारे सजवली गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या खास लूकमुळे थार कारची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages