२६ मे रोजी विमानसेवा सुरू न झाल्यास होटगी रोड विमानतळाला प्रतिकात्मक ताळे ठोकणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- होटगी रोड सोलापूर विमानतळाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ महिने पूर्वी झाले. मात्र, आजतागायत नागरी विमानसेवा सुरू झाली नाही. हे केवळ प्रशासनाचे अपयश नसून, थेट पंतप्रधानांचा अवमान असल्याचे मत सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे.
जिल्हाधिकारी यांनी घोषित केल्या प्रमाणे विमानसेवा सुरू न झाल्यास येत्या २६ मे रोजी सोलापूरकर विमानतळाला प्रतिकात्मक ताळे लावण्याचा इशारा दिला आहे.
"आम आदमी साठी नाही, तर खास लोकांसाठीसुद्धा ही सेवा उपलब्ध नाही हे दुर्दैवी आहे," असे सदस्यांनी सांगितले. यापुढे सोलापूरच्या सर्व लोकप्रतिनिधींना तथा मंत्री, खासदार, सर्व आमदार यांना रोज एस.एम.एस पाठवण्याचा निर्णयही मंचाने घेतला आहे.
या वेळी मंचाचे सदस्य मिलिंद भोसले, केतन शहा, योगिन गुर्जर, विजय कुंदन जाधव, अॅड. दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षिरसागर, अर्जुन रामगिर, श्रीकांत अंजुटगी, घनश्याम दायमा, रमेश माळवे, प्रसन्न नाझरे, जयश्री तासगावकर, सुहास भोसले, नरेंद्र भोसले, आनंद पाटील, वासुदेव आडके, भारत पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments