डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 17, 2025

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी

 डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी



    


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारत रत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हजरत ख्वाजा गरीब नवाज सामाजिक संस्था व लोकसेवा सामाजिक संस्था यांच्या वतीने नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर मोफत आयोजित केले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस श्रीकांत वाघमारे व डॉ रफिक सय्यद यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. आरोग्य शिबीराचे उद्घाटन आरीफ रंगरेज हत्तीरोग कर्मचारी संघटना  सोलापूर जिल्हा अध्यक्ष व विनायक फलटणकर  यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शंभर लहान मुलांना अस्लम पठाण व अविनाश चौंडे यांच्या हस्ते लाडु व समोसे वाटप करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिरात ११४ रुग्णांना मोफत तपासणी करण्यात आली. कार्यक्रमास हाजी सालिक शेख मुस्तफा शेख ,जाविद शेख, मशाक शेख ,जाकिर शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहेमद बांगी अकिल शेख व के जी एन सोशल फाउंडेशन व लोकसेवा सामाजिक संस्था यांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले . आरोग्य तपासणी डॉ मुजावर व शेख यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्लम तांबोळी यांनी केले तर आभार प्रदर्शन फिरोज मुलाणी अध्यक्ष यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages