पापय्या तालीम संघात हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात
साजरा व महाप्रसाद वाटप.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर दि. १२.०४.२०२५ रोजी जुनी मिल कंपाउंड येथील ऐतिहासिक वारसा पापय्या तालीम संघात हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तीमय, मंगलमय व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.यानिमित्त श्री हनुमान देवता मुर्तीची विधीवत पूजा, अभिषेक, आरती तालमीचे वस्ताद गणेश कुलकर्णी यांचे हस्ते तसेच अध्यक्ष जगन्नाथ व्यवहारे, उपाध्यक्ष जयंत मोरे, सेक्रेटरी प्रदीप शिर्के, गजानन लामकाने, प्रकाश सुरवसे, प्रकाश कदम, विजय पाटील, लक्ष्मण भगत, शिवाजी चटके, किरण बायस,प्रकाश पवार, राम चटके, अजीत शिंदे, राहुल चटके, किरण डोंगरे, सचीन गुंड, संभाजी मळगे,तानाजी सावंत, माणिक पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी परिसरातील भाविक व व्यायामपटू यांनी गुलाल व फुलांची उधळण केली व तदनंतर संस्थेच्यावतीने उपस्थित शेकडो भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.
जन्मोत्सव सोहळयाचे औचित्य साधून मा. आ.देवेंद्रजी कोठे, माजी नगरसेवक विनायक
कोंडयाल, दयावान ग्रुपचे सामाजिक युवा नेते नागेश खरात, उप महाराष्ट्र केसरी पै. भरत मेकाले, माजी नामाकिंत क्रिकेट पटू के टी पवार, स्वरूपा योगा सेंटरचे प्रशिक्षक जयंत पडसलगीकर, लोकहित साप्ताहिकाचे संपादक सुधाकर जांभळे, जुनी पोलीस लाईन गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अविनाश व्यवहारे, अॅङ प्रवीण निकम, ऋषिकेश मेट्रे आदी मान्यवरांनी तालमीस सदिच्छा भेट देवून दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला.
हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वश्री सुर्यकांत भगत, शिवराज गायकवाड, श्रीकांत
घाटे, रणजित खताळ, श्रीनिवास कोटा, बबन झिंगाडे, अतुल कोथिंबीरे, राजकुमार माचकनुर, आजीत शिंदे, सचिन हक्के, जय शिंदे, विकेश गायकवाड, सुरेश जानकर, कन्हैय्या मुक्ता, प्रवीण सुरवसे, ओंकार कोडगले, ऋषिकेश चव्हाण, अमोल जाधव, अनिल इंगळे, दिनेश गुरबाणी, समर्थ दुधाळ, संजय हिरळीकर, परशुराम कोळी, ओम इंगळे, वैभव फाळके, आयुष वाघमोडे, श्रेयस कागे, साईराज व्यवहारे इत्यादी युवक कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments