विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाचा रविवारी राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विश्वकर्मा पांचाळ सुतार सामाजिक संस्था पंढरपूरच्या वतीने पंढरपुरात विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा रविवार दि. 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 ते 5 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंढरपूर येथील रिलायन्स पेट्रोल पंपा समोरील न्यू सातारा संकुल येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन माजी आ. प्रशांतराव परिचारक, माजी आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी विश्वकर्मा विराट महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत गवळी, अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाचे अध्यक्ष हनुमंतराव पांचाळ, गणपतराव गायकवाड, क्रांतीनाना मळेगावकर, डॉ. बसवराज सुतार, ह भ प विष्णू कबीर महाराज , धर्मदाय आयुक्त कार्यालय अधीक्षक सत्यजित कुमठेकर, उद्योजक हेमंत धावड, सुभाष मस्के, पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष दिलीप पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी सकाळी 9 वाजता व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच आरोग्य शिबिर होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सुतार यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस मधुकर सुतार, चंद्रकांत सुतार, सचिन सुतार, नरसिंग सुतार, चंद्रकांत सुतार आदी उपस्थित होते.
0 Comments