Hot Posts

6/recent/ticker-posts

‘मनोरमा’च्या चौथ्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

 ‘मनोरमा’च्या चौथ्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन  


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र साहित्य परिषद प. सोलापूर व मनोरमा साहित्य मंडळी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “मनोरमा दिवाळी” 2025 च्या चौथ्या अंकाचे प्रकाशन दिवाळी पाडव्यानिमित्त बुधवारी (दि. 22) सकाळी पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा चेअरमन श्रीकांत मोरे होते.

मुख्य कार्यालय बेन्नूरनगर, आरटीओ ऑफिससमोर येथील मनोरमा सांस्कृतिक भवनात बुधवारी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त एम. राजकुमार, चेअरमन श्रीकांत मोरे, सौ. शोभा मोरे, सौ. अस्मिता गायकवाड, अॅड. सुरेश गायकवाड, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत, डॉ. सुमित मोरे, मनोरमा साहित्य पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. राजशेखर शिंदे, डॉ. मिताली मोरे, डॉ. ऋचा मोरे- पाटील, डॉ. आदित्य पाटील, सीईओ शिल्पा कुलकर्णी, सीईओ कविता कुलकर्णी, डॉ. शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. मनोरमा मल्टिस्टेटच्या चेअरमन सौ. शोभा मोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पोलिस आयुक्त यांनी मनोरमा बँकेच्या सभासदांशी एक विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. त्यामुळेच बँक आज प्रगतिपथावर आहे. हा विश्वास असाच पुढेही राहू द्यावा, असे सांगून त्यांनी बँकेच्या आर्थिक कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. चेअरमन श्रीकांत मोरे म्हणाले, मनोरमा बँकेने सलग सात वर्षे शून्य टक्के एनपीएचे प्रमाण राखले असून ते सभासदांनी दिलेल्या प्रेमामुळेच ते शक्य झाले असल्याचे सांगितले.

यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, किरण बनसोडे, मनोज पवार, नरेंद्र गुंडेली, शोभा गवळी, प्रतिभा मोरे- गलांडे, विजयकुमार शाबादे, सहकार खात्यातील ढोणे, तोगरे, फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे, उपाध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी, इनामदार, काशीद, माधवराव गव्हाणे, ज्येष्ठ नागरिक संघाचे डॉ. विलास मोरे, डॉ. राजेंद्र मायनाळे, संचालक प्रशांत शहापूरकर, गजेंद्र साळुंके, सुहास भोसले, मधुकर आठवले, विद्या भगरे भोसले आदी उपस्थित होते. यावेळी सभासद, ठेवीदार, खातेदारांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सर्व सभासदांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. पल्लवी पवार यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद मोरे यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Reactions

Post a Comment

0 Comments