त्रिसंधी आनंद सोहळा: पठाण शहावली बाबा दर्गा उरूस,
दीपावली पाडवा आणि वकिली पदवीचा जल्लोष !
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जाई जुईनगर ईच्छा भगवंताची फार्महाऊस येथे पठाण शहावली बाबा दर्गा उरूस, दीपावली पाडवा आणि ईच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक अनिल जाधव यांना नुकतीच प्राप्त झालेली वकिली पदवी या त्रिसंधी आनंदाच्या निमित्ताने भव्य स्नेहभोजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.हा सोहळा ईच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आधारस्तंभ लक्ष्मण (मामा) जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात पार पडला.या स्नेहभोजनात सर्वपक्षीय नेते, आजी-माजी आमदार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अनिल जाधव यांचा गौरव केला.कार्यक्रमास माजी राज्यमंत्री तथा सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख,माजी आमदार दिलीप माने,राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे,राष्ट्रवादी कार्याध्यक्ष जुबेर बागवान,प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे,स्थायी समिती माजी सभापती संजय कोळी,महिला बालकल्याण मा.सभापती सौ. आश्विनी चव्हाण,ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र जन्नू,काका प्रभाकर जामगुंडे,मा.नगरसेवक तोफिक पैलवान शेख,प्रथमेश दादा कोठे,मनोज भाईजी शेजवाल,रियाज भाई खैरादि, श्रीमती लताताई फुटाणे,नूतन प्रमोद गायकवाड,शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल,सेवादल उपाध्यक्ष चंद्रकांत दायमा, सामाजिक कार्यकर्ते अजित भाऊ गायकवाड,सचिव इरफान शेख,अजमल शेख,तसेच अश्विनी हॉस्पिटलचे डॉ.सुजित जहागिरदार, डॉ.मिलिंद जोशी, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष संगिता जोगदनकर,युवती शहराध्यक्षा किरण मशाळकर,ज्येष्ठ चंद्रकांत मामा गायकवाड,सूर्यकांत गायकवाड,मोची समाज शहराध्यक्ष करेप्पा जंगम,नागनाथ कसलोलकर, सिद्राम कामाटी,अर्जुन साळवे, टकारी समाज युवक अध्यक्ष विनोद जाधव,राजू गवळी गायकवाड, अंबादास गायकवाड, ज्येष्ठ हेमंत चौधरी,आनंद मुस्तारे,सिद्धाराम खजूरगी, भीमा आचारी वाघमारे, शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष पवार सर शोभा गायकवाड,श्रीमती कामतकर,सुनिता बिराजदार, प्रमिला स्वामी,सिया मुलांनी,लता ढेरे,जयश्री पवार शशिकला कस्पटे, मारता असादे, जब्बर चाचा, इरफान शेख पंपू शेख आणि विविध समाज संघटनांचे पदाधिकारी आणि सोलापूर दैनिक प्रतिनिधी, उपसंपादक, वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी आदींचे उपस्थित होती.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अनिल जाधव यांना वकिली पदवी मिळाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. त्यांच्या कार्यातून समाजात सामाजिक एकोपा, सौहार्द आणि विकासाची दिशा कायम राहील, असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला.स्नेहभोजन सोहळ्याचे उत्तम नियोजन शिवाजी मामा गायकवाड, चंद्रकांत ब्रदर जाधव, आणि राजू दादा जाधव यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार किसन जाधव, नागेश गायकवाड, अनिल जाधव आणि चेतन नागेश गायकवाड (प्रदेश युवक सरचिटणीस) यांनी केले.या कार्यक्रमाने समाजातील सर्व स्तरांना एकत्र आणत “सामाजिक सौहार्द आणि एकतेचा सुंदर संदेश” दिला असून, जाईजुई नगर परिसरात हा सोहळा चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे.
.png)
0 Comments