बार्शी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
महाविकास आघाडी सोबत- अॅड. आरगडे
बार्शी (कटूसत्य वृत्त):- राज्यामध्ये आणि बार्शीतही महायुतीला तोंड देण्यासाठी महाविकास आघाडी करत असलेली व्यापक रणनीती लक्षात घेऊन बार्शी तालुक्यातील आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी सोबत सुसंवाद आणि सामंजस्य ठेवून लढवणार आहे,असे प्रतिपादन बार्शी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष अॅड. जीवनदत्त आरगडे यांनी केले.विधानसभा मतदारसंघ प्रभारी पांडुरंग कुंभार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या शहर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत जगदाळे, आरगडे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे. टी. जाधव, तानाजी दत्तात्रय गाढवे, विजय ठाकूर, निलेश मांजरे, रणधीर गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी पांडुरंग कुंभार यांनी बार्शीमध्ये काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी सर्व गट तट विसरून एकोप्याने प्रयत्न करत बार्शीमध्ये काँग्रेसचा भविष्यात आमदार कसा होईल हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आगामी निवडणुका लढवण्यासाठी कार्यकत्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले. यावेळी बार्शी नगरपालिका,जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती अशा सर्व निवडणुकांच्या बाबतीमध्ये आगामी काळातली ध्येयधोरणे लवकरच निश्चित केली जातील असे आरगडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments