“राज्य रसातळाला! पोलिस भाजपचे कार्यकर्ते झालेत”
— सुषमा अंधारेंचा स्फोटक आरोप!
सोलापूर/मुंबई (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी अशी पत्रकार परिषद आज शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या) नेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली असून, त्यांच्या वक्तव्याने राज्यात खळबळ माजली आहे. “या राज्याचे पोलीस आता एका पक्षाचे कार्यकर्ते झाले आहेत; कायदा नाही, सत्ता बोलतेय,” असा थेट आरोप त्यांनी भाजपावर केला आहे.
पुढे अंधारे म्हणाल्या, “महाराष्ट्र रसातळाला पोचला आहे. न्याय, प्रशासन, कायदा सगळं काही एका पक्षाच्या ताब्यात गेलंय. आता पोलिसही सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचताना दिसत आहेत. फलटणमध्ये गेल्या काही दिवसांत जे घडलं, ते राज्याच्या इतिहासातील सर्वात काळं पान आहे.”
त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका करत म्हटलं की, “काल फडणवीस फलटणमध्ये जाऊन रणजितसिंग नाईक-निंबाळकर यांना घरपोच ‘क्लीन चीट सेवा’ दिली. पण हेच ते व्यक्ती आहेत ज्यांच्यावर भाजपात गेल्यापासून तब्बल 277 गुन्हे दाखल झाले आहेत. ऊसतोडणी कामगारांना वेठीस धरणे, धमक्या देणे आणि अनेकांना सामाजिकदृष्ट्या संपवणे ही त्यांची कृत्ये आहेत.”अंधारे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारवर ‘राज्य दहशतीकडे नेतंय’ असा आरोप केला आहे, तर सत्ताधाऱ्यांकडून अंधारे यांच्या आरोपांना राजकीय नौटंकी म्हटलं जात आहे.
राज्यातील जनतेमध्ये मात्र या पत्रकार परिषदेतील उघडकींनंतर संतापाची लाट उसळली आहे. “जे चाललंय ते भयंकर आहे,” असं अनेक नागरिकांचे म्हणणं आहे.“हे प्रकरण केवळ राजकारण नाही, तर लोकशाहीच्या आरोग्याचा प्रश्न आहे. जर पोलीस आणि सत्ता एकाच पक्षाच्या हुकमतीखाली गेले, तर राज्यात न्याय उरणार नाही,” असा इशारा निरीक्षकांनी दिला आहे.
.jpg)
0 Comments