माढ्यात शुक्रवारी पावसाची धुवाधार हजेरी 


माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्यासह तालुक्यातील अन्य गावात पावसाने जोरदार हजेरी लावली.विजांच्या कडकडासह शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता सुरु झालेल्या पावसाने दिड तास हजेरी कायम ठेवली.शनिवारी सकाळी पावणे आठ वाजेपर्यंत ३१.३८ मि. मि पावसाची नोंद झाली.माढा मंडळ मध्ये सर्वाधिक ४५.२ मि.मी तर कुडूॅवाडी मंडळ मध्ये कमी २.२ मि.मी पावसाची नोंद झाली.मागील आठवड्यापासुन कमी अधिक प्रमाणात सुरु असलेल्या या पावसाने उडीद उत्पादक शेतकर्याचे मोठं नुकसान केले आहे.पाऊस उघडीपच देत नसल्याने शेतकर्याचा उडीद वाहुन गेला असुन अनेकांचा वाळु घातलेला उडीद भिजुन नुकसान झालंय.शुक्रवारच्या झालेल्या पावसाने
रणदिवेवाडी गावच्या स्मशान भुमी कडे जाणारा रस्ताच वाहुन गेला असुन वस्तीवर जाणारा रस्ताच बंद झाल्याने नागरिकांचे दळणवळण बंद झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.दुर्देवाने गावात एखादा जरी व्यक्ति मयत झाला तरी गावातील स्मशानभूमीत नेता येणे अशक्य झाले आहे.तहसील प्रशासनाच्या अधिकार्यानी परिस्थिती पाहुन नुकसान झालेल्या शेतकर्याचे व वाहुन गेलेल्या रस्त्याची पाहणी करुन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी दिगंबर इंगळे व उपसरपंच दत्ता शिंदे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
0 Comments