विठ्ठल कॅर्पोरेशनचा १४ वा बाॅयलर पुजन कार्यक्रमाचे आयोजन
आ.संजयमामा शिंदे यांचे हस्ते दि.८ ऑक्टोंबर रोजी होणार
कुर्डूवाडी(कटूसत्य वृत्त):- विठ्ठल कार्पोरेशन लि.म्हैसगाव साखर कारखान्याचा १४ वा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम सोहळा मा.श्री.संजयमामा विठ्ठलराव शिंदे,आमदार करमाळा-माढा यांचे हस्ते दि.०८/१०/२०२१ रोजी सकाळी १०:२५ वा.आयोजित करण्यात आलेला आहे.अशी माहिती विठ्ठल काॅर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक यशवंत भैय्या शिंदे यांनी दिली आहे.विठ्ठल कार्पोरेशन लि.म्हैसगाव तालुका माढा या कारखान्याचा गाळप हंगाम सन २०२१-२२ ची पूर्व तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे.तसेच गाळप हंगाम २०२०-२१ करिता कारखान्यास गाळपास आलेल्या ऊसास दिवाळी सणा निमित्त तिसरा हप्ता प्रती मे. टन रु.६८.१२ प्रमाणे पेमेंट विभागीय शेती गट ऑफिस मधून सभासद व बिगर सभासद शेतकरी यांना चेकद्वारे वाटप सुरू करण्यात आलेले आहे.अशी माहिती विठ्ठल काॅर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक यशवंत शिंदे व कार्यकारी सल्लागार एच.बी.डांगे यांनी दिली आहे.
0 Comments