Hot Posts

6/recent/ticker-posts

चोरी, रॉबरीचे गुन्हे असणाऱ्या आरोपीस नातेपुते पोलीसांनी केले अटक

 चोरी, रॉबरीचे गुन्हे असणाऱ्या आरोपीस नातेपुते पोलीसांनी केले अटक




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते हद्द पुणे पंढरपूर रोडवर इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोलपंप येथे दीपक जनार्दन चव्हाण राहणार मोराची तालुका माळशिरस हा डिझेल टाकण्याचे काम करित असता भरदुपारी दोन अनोळखी इसम महेंद्रा कंपनीची थार कारमध्ये
 डिझेल भरून  ६,२०० रुपये उकळून लुटल्याचा प्रकार १ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३:५० वाजता घडला. त्यानंतर नातेपुते पोलिसांनी दोघांना पकडून त्यांच्याकडून महेंद्रा कंपनीची थार कारसह पैसे जप्त केले. त्यांच्यावर कोल्हापूर, सांगली  तसेच धाराशिव जिल्हा येथे चोरी व रॉबरी चे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात मिळालेली आहे.आकाश प्रकाश शिंदे (वय २४, कोल्हापूर) व नवनाथ किसन सरगर
 ( वय ३०, सांगली ) असे पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी महेंद्रा कंपनीची थार कार (एम. एच. ०६ /सी.जी. ५५५८) मधून पेट्रोल पंपावर आले. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यास ४ हजारांचे डिझेल भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याकडूनच ६,२०० रुपये जबरदस्तीने घेऊन पळून गेले.  दीपक जनार्दन चव्हाण राहणार मोराची तालुका माळशिरस
यांच्या फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणे येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.नातेपुते पोलीस ठाणे  गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हे बारामतीकडून पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळाली असता तात्काळ माळेगाव (बारामती) पोलीस ठाण्याची मदतीने  आकाश प्रकाश शिंदे वय २४ वर्ष राहणार सावकार गल्ली मोरेवाडी प्लॉट नंबर दोन तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर व नवनाथ किसन सरगर वय ३० वर्ष राहणार करगणी तालुका आटपाडी जिल्हा सांगली यांना ताब्यात घेतले. सदर वरील घडल्या गुण्याबाबत विचारले असता गुन्हा केल्याचे कबूल केला असुन सदर गुन्ह्यात वरील दोघांआरोपींना अटक केली असून  सदर गुन्ह्यात हिसकावून घेऊन गेलेल्या रकमेसह १०, ००, ७०० / -  रुपये किमतीचा मुद्देमालासह महिंद्रा थार कार मोबाईल व रोख रक्कम आरोपीकडून जप्त करण्यात आली.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज संतोष वाळके यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक  महारुद्र परजने  ,सहा पोलीस  फौजदार, महादेव कदम, पोलीस हवालदार धनाजी शेळके पोलीस नाईक अमोल वाघमोडे,राकेश लोहार, पो.कॉ. मनोज शिंदे, रणजीत मदने, दिनेश रणवरे, जावेद आतार, नातेपुते पोलीस ठाणे तसेच सायबर शाखेकडील जुबेर तांबोळी यांनी केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments